हृदयस्पर्शी : 777 चार्ली
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसाच म्हणावा लागेल. आपल्या नजरेआड खूप काही घडत असते. तेच समोर आणण्याचे एकमेव माध्यम म्हणजे चित्रपट. अशीच एक हृदयस्पर्शी कथा 777 चार्ली या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 777 आणि चार्ली म्हणजे काय? यांचा परस्पर नक्की संबंध तरी काय ? प्रेम म्हणजे काय, प्रेम कुणावर करावं आणि का करावं? तसेच प्रेमाची खरी परिभाषा काय? अशा अनेक भाव-भावनांचा उलगडा करणारा हा चित्रपट आहे. चला तर या चित्रपटावर चर्चा करत मनात निर्माण झालेला गुंता सोडवूया.
या चित्रपटाची कथा फिरते ती 'धर्मा आणि चार्ली' या दोघांच्या भोवती. चार्ली व्यक्ती नसून एक श्वान आहे. आणि धर्मा एक असा व्यक्ती जो स्वतःचे आयुष्य एकटेपणामध्ये जगतो आहे. रोज सकाळी उठणे, सिगरेट पिणे, टी.व्ही. बघणे आणि कंपनीमध्ये कामावर जाणे व घरी परत येतांना इडली घेऊन खाणे आणि झोपणे. असे एक साचेबध्द आयुष्य जगणारा. धर्मा एकटेपनामुळे त्रस्त आहे. मात्र त्याला आयुष्यात कोणाच्याही आधाराची गरज वाटत नाही. आपण या आयुष्यात एकटेच 'परफेक्ट' आहोत असे धर्मा समजतो. अशातच अचानक एका रात्री चार्ली त्याच्या आयुष्यात दाखल होते. या ठिकाणी संवाद असा आहे की "तुम्ही जर लकी असाल तर कुत्रा तुमची निवड करेल..! जर तुम्ही लकी असलात तरच..!" हा संवाद अगदी साधा वाटत असला तरी देखील अर्थ समजून घेण्यासारखा आहे. कारण ज्यावेळी कोणताही प्राणी तुमची निवड करतो तेव्हा तुमच्यामध्ये असलेल्या गुणांची पारख करून तो निवड करतो आणि तुम्ही तसे आहात याची खात्री आणि विश्वास त्याला झालेला असतो. आणि अशी घटना क्वचितच घडत असते. अशा प्रकारे चार्लीकडून धर्माच्या घरी उपद्रव घालने सुरु असते. या त्रासाला कंटाळून खूप वेळा धर्मा चार्लीपासून दूर जाण्याचा प्रयत्नही करतो; परंतु हे सर्व उपाय निष्फळ ठरतात. सुरवातीला मनोरंजन करणारी ही कथा मध्यांतरानंतर एक वेगळेच वळण घेते.
कालांतराने चार्ली धर्माच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. आणि धर्माच्या आयुष्यात प्रेमाचे मनमोहक संगीत वाजू लागते. अगदी लहानपणापासूनच टी.व्ही समोर नाचणारी चार्ली बघून धर्मा समजत असतो की, तिला आइसस्क्रीम आवडते. जेव्हा धर्माला सत्य कळते तेव्हापासून एका नवीन प्रवासाला सुरवात होते. आणि आयुष्यात कोणासाठी काहीच न केलेला धर्मा चार्लीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक योजना आखतो. आणि दोघे जण एका प्रवासाला निघतात. हा प्रवास हृदय स्पर्शी आहे. या प्रवासात प्रेमचा आत्मिक अनुभव बघायला मिळतो. चार्लीच्या आयुष्यात अशी काय घटना घडली आहे की तिचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धर्मा सर्व संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे. तसेच धर्माच्या एकटेपणाचे नक्की कारण काय आहे? या सर्व प्रश्नांची उलगडा चित्रपट पाहिल्यानंतरच होईल.
चित्रपटात " A deal of Dharmaraj in Kaliyug" हे वाक्य वापरण्यात आले आहे. महाभारतात जेव्हा धर्मराज युधिष्ठिर यांना स्वर्गात येण्यास सांगितले जाते. तेव्हा संपूर्ण प्रवासात आपली सोबत न सोडणाऱ्या श्वानालादेखील सोबत घेणार असाल, तरच मी येणार असल्याचे युधिष्ठिर सांगतो. त्याच प्रेमाच्या भाव-भावना या चित्रपटात दिसून येतात. दिग्दर्शक किरणराज के. यांनी मनुष्य व प्राणी यांच्या भाव-भावनांचा सुंदर मिलाप या चित्रपटात मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसते. अभिनेता रक्षित शेट्टी व चार्ली यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. तसेच अभिनेत्री संगीता सिगेरी, दानिश, बॉबी सिम्हा यांनी देखील चित्रपटात उत्तम भूमिका केली आहे. नोबिन पॉल यांच्या संगीताने संगीतबद्ध असणारा हा चित्रपट एका नवीन जगात प्रवास घडवतो.
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
आपण 777 चार्ली सिनेमाची,. जी समीक्षा केली आहे खूप सुंदर आहे .प्रेम म्हणजे काय ,प्रेम कुणावर करावे ,का करावे ,यामुळे सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढणारी मूल्यमापन केले आहे ते अगदी बरोबर आहे धन्यवाद
उत्तर द्याहटवाThank you for comment and Support 😊🙏🏻
हटवा